अमोल राऊत/मुंबई
केंद्रीय अमली पदार्थ विभागाने कॉर्डेलिया कुझवर केलेल्या छापेमारीत बॉलिवुडमधील अनेकांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. या कुझवरील पार्टीचे गोवा हे केंद्र असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोवा निवडणूकांचे बिगुल वाजले असून, कोणत्याहीक्षणी निवडणुकांच्या तारखा आणि आचारसंहीता घोषीत होण्याची शक्यता असल्याने, त्यापुर्वी या रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याची म]िहती एनसीबीतील अधिकृत सुत्रांनी दैनिक तरूण भारतशी बोलताना दिली.
यासाठी आयोजक गोपाळ आनंद याच्या कंपनीने पुढाकार घेत ही पार्टी आयोजीत केली होती. गोपाळ आनंद हा अनेक पक्षांच्या राजकीय वर्तुळात फिरणारा व्यक्ती असल्याने त्यांचे सर्वांशी संबध आहेत. या संबधातुनच त्याने दिल्ली, मुंबई आणि गोवा येथील राजकीय नेते, आयपीएस अधिकारी तसेच बॉलिवुडमधील प्रसिद्ध व्यक्ती यांना निमंत्रण दिले होते. त्यानुसार, 2 ऑक्टोंबरला ही पार्टी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कुझ ट]िर्मनल येथुन सुरु होणार होती. तर ही कुझ गोवा येथे पोहचल्यानंतर या पार्टीचे जंगी पार्टीत रुपांतर होणार होते. यासाठी गोवा येथील किनाऱयापासुन अनेक व्हिव्हिआयपीना या कुझवर आणण्यासाठी बोटी तैनात करण्यात आल्याची माहिती एनसीबीतील अधिकृत सुत्रानी दिली. त्याचप्रमाणे, गोवा येथे ही कुझ पोहचल्यानंतर अमली पदार्थाची कमतरता भासु नसये, यासाठी अनेक तस्करांशी संधान साधण्यात आले होते. त्यानुसार, गेल्या आठ दिवसांत गोव्यात अमली पदार्थाचा मोठा साठा गोळा करण्यात आल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यातच या पार्टीची भणक एनसीबीला लागल्याची माहिती सुत्रानी दिली.
गोवा निवडणुका तोंडावर आल्याने, पुन्हा अशा प्रकारची पार्टी करता येणार नाही. तसेच गेली दोन वर्षे कोरोनामुळे अशा प्रकारच्या पार्टीचे आयोजन विरळ झाल्याने, ही पार्टी आयोजीत करण्यात आली होती. मात्र या पार्टीसाठी गोव्यातील काही राजकीय नेते आणि गोवा पोलीस दलातील काही अधिकारी येणार असल्याने, अवैधरित्या या पार्टीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱयाने दिली. मात्र तत्पुर्वीच एनसीबीने कुझवर छापेमार करीत पार्टी उधळुन लावल्याने, सतर्क झालेले राजकीय नेते आणि बॉलिवुड हस्तीनी गोवा किनाऱयावर फिरकण्याचे कटाक्षाने टाळल्याचे समोर आले आहे. तसेच अटक केलेल्या आठही जणांच्या चौकशीतुन जी धक्कादायक म]िहती समोर आली आहे, त्यानुसार, एनसीबीने राजकीय नेते तसेच बॉलिवुडकडे आपला मोहरा वळविला आहे. या पार्टीचे आयोजन करणारा गोपाळ आनंद याच्या चौकशीतुन महत्वाची माहिती मिळाल्यास, तत्काळ यातील संशयीतावर कारवाईचा फास आवळण्यात येणार असल्याची माहिती एनसीबीतौल वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.