प्रतिनिधी/ खानापूर
बिडी (ता. खानापूर) येथे महाविद्यालयात शिकणाऱया मुलीने स्वत:च्या ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. सदर मुलीचे नाव महेक शकील संगोळी (वय 19) असे आहे.
ती हल्याळ येथील एका खासगी महाविद्यालयात शिकत होती. मंगळवारी दुपारी ती महाविद्यालयाला जातो, असे सांगून गेली पण ती तिकडे न जाता राहत्या घरातील परसातील एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्यावर या संदर्भात नंदगड पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली. नंदगड पोलीस स्थानकचे उपनिरीक्षक उस्मान आवटी यांनी घटनास्थळी येऊन भेट दिली. घटनेचा रितसर पंचनामा केला. तिचे आई-वडील अत्यंत गरीब आहेत. आपली मुलगी चांगली शिकावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण आपल्या शिक्षणासाठी आई-वडीलांनी केलेले कष्ट पाहवले नाहीत. त्यातून तिने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.