प्रतिनिधी/ सातारा
पुन्हा सुरू या अभियानांतर्गत शाळा, कॉलेज अजून ही बंदच ठेकण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत.केवळ 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांनी उपस्थिती लावण्याच्या सूचना असल्याने शाळा, महाविद्यालयात सध्या कर्मचारी वर्ग निम्याने कार्यरत असून इतर काम सुरू आहेत. प्रवेश प्रकिया व इतर बाबी या ऑनलाईनच सुरू आहेत.शाळांना दिवाळीची दि. 12 ते दि. 16 या दरम्यान सुट्टी लागली आहे.
सातारा शहर हे शैक्षणिक हब नाही. परंतु शहरात ज्या शाळा, कॉलेज आहेत. त्यामध्ये कोरोना नसता तर पहिल्या सत्र परीक्षा सुरू असत्या. त्यामुळे डीजी कॉलेज असेल किंवा कला वाणिज्य असेल सर्वच कॉलेजमध्ये सध्या बाहेरून जे कॉलेजमध्ये माहिती घेण्यासाठी येतात त्यांची सर्व तपासणी करूनच आत सोडण्यात येत आहे.