वृत्तसंस्था / पालेर्मो
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पालेर्मो महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चौथी मानांकित ऍनेट कोंटावेट आणि फिओना फेरो यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. तब्बल पाच महिन्यानंतर डब्ल्यूटीए टूरवरील ही पहिली व्यावसायिक टेनिस स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात कोंटावेटने टॉप सीडेड पेत्रा मार्टिकचा 6-2, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱया उपांत्य लढतीत फेरोने इटलीच्या गिरोगीवर 2-6, 6-2, 7-5 अशी मात केली. कोंटावेट आणि फेरो यांनी यापूर्वी प्रत्येकी एकदा डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धा जिंकली आहे. 2017 साली कोंटावेटने हॉलंडमधील तर गेल्यावर्षी फेरोने स्वित्झर्लंडमधील टेनिस स्पर्धा जिंकली होती.