विनयभंग, मारहाण व ऍट्रॉसिटीन्वये गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
कोंडवे, ता. सातारा येथे नळाचे पाण्यामुळे चिखल झाल्याने याबाबत विचारणा केल्याच्या रागातून एका 47 वर्षीय महिलेस मारहाण करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेच्या शेजारी राहणाऱया दांपत्यासह एकावर विनयभंगासह ऍट्रॉसिटीचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार महिला (रा. पाण्याच्या टाकीजवळ, कोंडवे, ता. सातारा) यांनी शेजारी रहात असलेल्या मनिषा बाबासाहेब चोपडे यांना दि. 26 रोजी त्यांच्या नळाचे पाण्यामुळे चिखल होत असल्याने त्याबाबत विचारणा केली होती. याचा राग मनात धरुन बाबासाहेब अप्पा चोपडे हे दारु पिवून आले.
यावेळी बाबसाहेब चोपडे व मनिषा चोपडे यांनी तक्रार महिलेस शिवीगाळ करत हाताने तोंडावर, डोक्यावर, छातीवर मारहाण केली. त्या खाली पडल्या असताना त्यांना मारहाण केल्याने तक्रार महिलेच्या अंगावरील गाऊन फाटला. यामुळे त्यांच्या मनात लज्जा होईल असे वर्तन चोपडे दांपत्यानी केले. तसेच महिला मारहाणीच्या भीताने त्यांच्या घरी पळून जात असताना या दांपत्याने पाठीमागून खडी फेकून मारल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी बाबासाहेब चोपडे, मनिषा चोपडे व अप्पा गाडे (सर्व रा. कोंडवे) यांच्यावर मारहाण, विनयभंग व ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल पुढील तपास करत आहेत.