संगमेश्वर:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोंड असुर्डे ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना राबविल्या. जिल्हास्तरीय कोरोना योध्दा सन्मान पुरस्कारामध्ये सहभागी घेत तालुक्यात प्रथम येण्याचा क्रमांक पटकाविला. कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी गावातील कोरोना योध्दे महत्वाची भुमिका राबवित आहेत. ग्रामपंचायत कोंड असुर्डेच्यावतीने गावातील कोरोना योध्दाचा शाल,श्रीफळ व कोरोना योध्दा प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत कोंड असुर्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष रोहन बने, जि.प.सदस्या रचना महाडिक,सरपंच सदानंद करदोडे,उपसरपंच श्रीराम शिंदे,श्रीदेव राधाकृष्ण मंडळ कोडअसुर्डे अध्यक्ष दिपक शिंदे,महालक्ष्मी विकास मंडळ जांभूळवाडी अध्यक्ष यशवंत पानगले,हितवर्धक कमिटी बौध्दवाडी अध्यक्ष अनंत गमरे,ग्रामविकास मंडळ धाडवेवाडी अध्यक्ष संदिप धाडवे,ग्रामविकास समिती जांभूळवाडी अध्यक्ष कृष्णकांत डावल आणि कृष्णा पानगले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि.प.अध्यक्ष रोहन बने म्हणाले की,ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या उपाययोजना स्तूत आहेत. कोरोना युध्दाची लढाई अजुनही संपलेली नाही. कोरोना बरा होत असून कोरोना विषयी कोणीही माहिती लपवून ठेवू नये. समाज काय म्हणेल ते न पहाता पुढे येवून कोरोनावर उपचार करुन घ्या. कोंड असुर्डे गावाने कोरोना योध्दांची घेतलेली दखल नक्कीच कौतूकास्पद आहे. इतर ग्रामपंचायतींनीही या ग्रामपंचायतीचा आदर्श घेवून काम करावे असे पुढे बोलताना म्हणाले. जि.प.सदस्या रचना महाडिक यांनी सुध्दा कोंड असुर्डे ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचे कौतूक केले. यावेळी जि.प.अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून निवड करण्यात आलेल्या बचतगट महिला,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतीमध्ये महत्वाची भुमिका कोरोना योध्दांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक अर्जुन जाधव यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ देवून ग्रामपंचायतीने सत्कार केला. कार्यक्रमाला कोरोना योध्दयांना भेट म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने झाडे देण्यात आली.
जिल्हास्तरीय कोरोना योध्दा पुरस्कारामध्ये सहभागी होवून तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कोंडअसुर्डे ग्रामपंचायतीला जि.प. अध्यक्ष रोहन बने आणि जि.प.सदस्या रचना महाडिक यांच्या हस्ते पुरस्कार ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आला.