कोकणातील पहिलाच प्रयोग, सागरी कासवांचे मिळणार इत्यंभूत माहिती
दापोली / प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना (Konkan Sea Turtle) ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावून त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. या अभ्यासाकरिता २५ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन कासवांना सॅटलाईट ट्रान्समीटर लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच समुद्री कासवांना ‘सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावून त्यांचा स्थलांतराचा अभ्यास करण्यात येत आहे. हा अभ्यासप्रकल्प कांदळवन कक्ष, मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’मार्फत (डब्लूआयआय) राबविण्यात आला आहे.