दापोलीतील केंद्रासाठी जागेचा शोध, – अलिबाग, तोंडवलीतही केद्रांसाठी निधी
प्रतिनिधी/रत्नागिरी
राज्य वन विभाग सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी येथे कासव संवर्धन व उपचार केंद्र उभारणार आह़े रत्नागिरीतील दापोली येथील उपचार केंद्रासाठी जागेचा शोध सुरु झाला आह़े या उपचार केंद्रामुळे बोटींच्या पंख्यामुळे जखमी होणाऱया कासवांचा जीव वाचवणे शक्य होणार आह़े
वन विभाग सिंधुदुर्गमधील तोंडवली, रायगड जिह्यातील अलिबाग आणि रत्नागिरी जिह्यातील दापोली येथे कासव संवर्धन व उपचार केंद्र सुरू करणार आहेत़ तोंडवली येथील कासव उपचार केंद्रासाठी पर्यावरण विभागाकडून 46 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली होती. सिंधुदुर्ग जिह्यात दरवर्षी किमान 30 कासवे जखमी होतात़ कासव जखमी होण्याची संख्या अलिबागमध्ये सर्वाधिक आह़े
अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी म्हणाले, ‘वनविभागाला सिंधुदुर्गातील तोंडवली कासव उपचार केंद्राच्या इमारतीसाठी 40 लाख रुपये व उपकरणासाठी 6 लाखांचा निधी मिळणार आह़े दापोली येथेही उपचार केंद्रासाठी योग्य जमीनीचा शोध घेण्यात येत आह़े अलिबागमधील कासव उपचार केंद्र परीक्षेत्र वनविभागाच्या शेजारीच उभारणार असल्याची माहिती तिवारी यांनी दिल़ी जखमी कासवांवर उपचार करताना वन विभाग स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांची मदत घेणार आह़े
मासेमारी करणाऱया नौकांच्या पंख्यामुळे समुद्रातील अनेक कासवे जखमी होतात़ व जखमी कासवे मासेमारी करणाऱया मच्छीमारांच्या जाळ्यात अडकतात, शरीराचे अवयवही गमावतात. समुद्रातील प्लास्टिकमुळेही कासवांवर अनिष्ट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
जखमी कासवांच्या जतनासाठी उपयुक्त
रत्नागिरीमध्ये 2003 पासून कासव संरक्षण व संवर्धनाचे काम चालू झाले आह़े मुख्यतः पावसाळय़ात कासवे मोठय़ा प्रमाणात जखमी होऊन किनाऱयावर लागतात़ अशा जखमी कासवांवर उपचाराची सुविधा नव्हत़ी दापोलीमध्ये होणाऱया कासव उपचार केंद्रामुळे ती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोकणकिनारपट्टीवर जखमी अवस्थेत सापडणाऱया कासवांचे जतन संरक्षण होणार आह़े