प्रतिनिधी / रत्नागिरी
जिह्यातील झर्ये येथील दीप्ती विश्वासराव या मुलीला डॉक्टर बनण्यासाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर मदत करणार आह़े यामुळे झर्ये गावातील पहिली डॉक्टर होण्याच्या दिशेने दिप्तीने टाकलेल्या पावलांना भक्कम आधार प्राप्त झाला आहे.
दीप्ती एक हुशार विद्यार्थिनी असून भविष्यात डॉक्टर होवून रुग्ण सेवा करण्याचे स्पप्न तिने उराशी बाळगून जिद्दीने अभ्यास सुरु केल़ा तिच्यासाठी ही वाटचाल नक्कीच सोपी नव्हत़ी झर्ये हे गाव दुर्गम ठिकाणी असल्याने तिला ऑनलाईन अभ्यासासाठी धडपड करावी लागत होत़ी लॉकडाऊनच्या काळात दररोज एक किमी पायपीट करत मोबाईल नेटवर्क उपलब्ध आहे, अशा ठिकाणी जाऊन तिने ज्ञानार्जन केले. तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रवेश परीक्षेत (नीट) आवश्यक गुण मिळवून तिने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आह़े
डॉक्टर होण्यासाठी एक अवघड टप्पा तिने पार केला. मात्र त्यापुढेही अडचणी संपल्या नव्हत्याच. दिप्तीची खरी परीक्षा प्रवेश घेतल्यानंतरही चालूच होत़ी दिप्तीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढील शैक्षणिक खर्च सांभाळण्याचा प्रश्न तिच्या कुटुंबीयासमोर उभा होत़ा तिच्या नातेवाईक व इतर मित्रमंडळीनी थोडीफार मदत केल़ी मात्र ती अपुरी होत़ी तेथील वसतिगृह व इतर खर्च कुटुबियांच्या आवाक्याबाहेर होते. अशा संकटसमयी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या कोकणकन्येसेठी धावून आल़ा
सचिन तेंडुलकर आणि एसएसएफचा विद्यार्थी विकास योजना (व्हीव्हीवाय) यांच्या माध्यमातून दिप्तीसारख्या होतकरू, लढवय्या तरुण-तरुणींना शैक्षणिक कामासाठी शिष्यवृती प्रदान करण्यात येत़े हा प्रकल्प समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या दिशेने कार्य करत आह़े
डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार
सेवा फाऊंडेशनच्या (एसएसएफ) माध्यमातून दीप्तीचा परिस्थितीशी सुरु असलेला लढा सचिन तेंडुलकरला समजला. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमार्फत दिप्तीला शिष्यवृत्ती देण्यात आली आह़े एस.एस.एफ.च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ संदेशात दिप्तीने म्हटलं आहे की, शिष्यवृत्ती प्रदान केल्याबद्दल सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची आभारी आहे. शिष्यवृत्तीमुळे सर्व आर्थिक भार कमी झाला आहे. ज्यामुळे अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकणार आह़े डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. यापुढे दीप्ती म्हणाली की, मी वचन देतो की मी कठोर परिश्रम करीन आणि सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने मला जशी मदत केली तशीच मी एक दिवस इतर हुशार विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेऩ