प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावर एकामागोमाग एक साप्ताहिक विशेष गाड्यांची खैरात सुरूच आहे. कोकण मार्गावर ७ डिसेंबरपासून त्रिवेंद्रम – वेरावल साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे. दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने चालवण्यात येणारी ही गाडी पूर्णपणे राखीव असणार आहे.
दर सोमवारी त्रिवेंद्रम रेल्वे स्थानकातून सायंकाळी ३.४० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सायंकाळी ३.४५ वाजता वेरावलला पोहचेल. परतीच्या प्रवासात वेरावल येथून दर गुरुवारी सकाळी ६.४० वाजता वेरावल रेल्वे स्थानकातून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता त्रिवेंद्रमला पोहचेल. २२ डब्यांची ही साप्ताहिक गाडी वसई मार्गे धावणार आहे. या गाडीला कोकण मार्गावर पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ आदी ठिकाणी थांबे देण्यात येणार आहेत.