खेड /प्रतिनिधी :
कोकण रेल्वे मार्गावरील कडवई रेल्वे स्थानक कार्यान्वित करण्याच्या पूर्व तयारीसाठी 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. आरवली ते संगमेश्वर रोड दरम्यान काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावर मुंबईहून मडगावला जाणारी मत्सगंधा एक्सप्रेस खेड ते चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान 60 मिनिटे थांबवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे