दुचाकीवरील ताबा सुटल्याने घडला अपघात
वार्ताहर/ कोगनोळी
ऊस वाहतूक करणाऱया ट्रॉलीखाली चक्कर येऊन पडून एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास कोगनोळी येथील लोखंडे गल्लीजवळ घडला. प्रकाश उर्फ रायगोंडा पिरगोंडा पाटील (वय – 76, रा. किल्ला विभाग कोगनोळी) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
येथील लोखंडे गल्लीमध्ये कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर-ट्रॉलीमधून ऊस घेऊन कागलकडे जात होता. याचदरम्यान प्रकाश पाटील हे आपले बँकेतील काम आटोपून आपली मोटारसायकल (क्र. एम. एच?. 09 बी. व्ही. 9387) या दुचाकीवरुन घरी जात होते. येथील लोखंडे गल्लीत आले असता गाडीवरील ताबा सुटून ते खाली पडले. जवळून जात असलेल्या ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टरच्या ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले. ट्रक्टर चालक सौरभ राजाराम कोराने (वय-25, रा. नागाव, ता. करवीर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोगनोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार एस. के. पाटील, एस. टी. कंबार, अमर चंदनशिवे, परशुराम घस्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. अपघातानंतर मृतदेह विच्छेदनासाठी निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कोगनोळी येथील प्रति÷ित नागरिक म्हणून प्रकाश पाटील सर्व पंचक्रोशीत परिचित होते. अचानक त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.