रास्तारोको करत वाहतूक धरली रोखून : शिवसैनिक-पोलीस यांच्यात बाचाबाची
वार्ताहर / कोगनोळी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील दूधगंगा पुलावर कर्नाटक शासनाने उभारलेल्या सीमा तपासणी नाक्मयावर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने गुरुवारी सकाळी धडक मोर्चा काढला. काही काळ रास्तारोको करत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली.
येथील तपास नाक्मयावर आरटीपीसीआर रिपोर्टची सक्ती करत वाहनधारकांची अडवणूक केली जात असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबवावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने गुरुवारी दूधगंगा नदीजवळील तपासणी नाक्मयावर मोर्चा काढून कर्नाटक पोलिसांना जाब विचारला. या वेळी शिवसैनिक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.
यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, कर्नाटक शासनाने दूधगंगा नदीजवळ चुकीच्या पद्धतीने तपासणी नाका सुरू केला असून त्याचा महाराष्ट्रातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. कर्नाटक शासनाने हा सीमा तपासणी नाका तवंदी येथे सुरू करावा. महाराष्ट्रात जाणाऱया लोकांना सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया वाहनांना अडविण्यास सुरुवात करताच पोलीस व शिवसैनिक यांच्यात किरकोळ झटापट झाली. महाराष्ट्र पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, उपजिल्हाध्यक्ष संभाजी भोकरे, सुजित चव्हाण, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, मनजीत माले, संदीप पाटील, प्रदीप क्षीरसागर, विद्या गिरी, दिपाली घोरपडे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.