वार्ताहर/कोगनोळी
केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी सीमा तपासणी नाक्मयावरील परिस्थिती जैसे थे आहे. कर्नाटकात जाणाऱया वाहनांची संख्या कमी झाली असली तरी पोलीस बंदोबस्त मात्र कायम आहे. गेल्या चार दिवसात कर्नाटकात जाणाऱया प्रवाशांची संख्याही मंदावली आहे. मात्र दुचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. सेवा सिंधु ऍपवर नोंदणी असणाऱयांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. नोंद नसल्यास संबंधितांना प्रवेश नाकारला जात आहे.
कर्नाटकात जाणाऱया लोकांची नोंदणी व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सीमा तपासणी नाक्मयावर पोलीस प्रशासन, महसूल विभाग, वैद्यकीय विभागातील कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दूधगंगा नदीपासून टोलनाक्मयापर्यंत येणाऱया वाहनांची 3 ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. या तपास नाक्मयावर तहसीलदार प्रकाश गायकवाड, उपतहसीलदार अभिजीत बोंगाळे, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे फौजदार बी. एस. तळवार, साहाय्यक फौजदार एस. ए. टोलगी यांच्यासह अन्य कर्मचारी प्रवाशांच्या सोयीसाठी कार्यरत आहेत.
200 लोकांचे जेवन
राजस्थानमधून बेंगळूरला जाणारे 49 मजूर हे सेवा सिंधु ऍपवर नोंद नसल्याने गेले 48 तास सीमा तपासणी नाक्मयावर अडकून पडले आहेत. शासनातर्फे 200 लोकांचे जेवण या ठिकाणी तयार करण्यात येत आहे, अशी माहिती येथील अधिकाऱयांनी दिली.