वार्ताहर / कोगनोळी
येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या प्रियदर्शनी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आशाराणी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल येथील महावीर जयंती उत्सव मंडळातर्फे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी कुमार पिडाप-पाटील यांनी स्वागत तर एल. डी. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. आशाराणी पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्या अमृता पाटील, महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे, राजगोंडा चौगुले, उदय मोनाप, संदीप खोत, रमेश पाटील, विरेंद्र चौगुले, अनिल पाटील, धीरज मगदूम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.