वार्ताहर / गोकुळ शिरगाव
सोमवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी आकराचे सुमारास कोगील खुर्द वरून कोगील बुद्रुकमध्ये जवळपास सहा गव्यांचा कळप अचानक कोगील बुद्रुक येथील पठारावर निवास ताकमारे यांच्या शेता शेजारी शेतकऱ्यांना दिसला. एवढा मोठा कळत बघून शेतकरी घाबरून दंगा करू लागले. शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना हुसकावण्यासाठी शेतकरी गव्यांना हाकलण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ धावू लागले.
तातडीने ग्रामपंचायतीने त्याची दखल घेत वन अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवले. वन अधिकाऱ्यांची टीम सुद्धा या ठिकाणी लगेच दाखल झाली. असून त्यांनी सर्वात आधी सर्व शेतकऱ्यांना दंगा न करता घरी जाण्याचे आव्हान केले. शेतकरीसुद्धा दुपारी तीन ते चारच्या सुमारास आपापल्या घरी परतले.
तर वनाधिकाऱ्यांनी या गव्यांचा आम्ही बंदोबस्त करू ते त्यांच्या आलेल्या मार्गाने दिवस मावळेल तसा मागे परत जातील असे ही ग्रामस्थांना विश्वासात घेत म्हणाले. या सर्व घटनेची माहिती कोगील बुद्रुक दूध संस्थेचे चेअरमन निवास ताकमारे यांनी तरुण भारतशी बोलताना यावेळी दिली.