कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे गावामध्ये नदीकाठी मगर दिसल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोगे गावात पश्चिमेकडे कुंभी व तुळशी नदीच्या संगमाजवळ राजाराम सदाशिव हरूगले यांचे शेत आहे.
तेव्हा नदीकाठी पाणी उपसा सिंचन करण्यासाठी जिथे मोटर बसवली जाते. त्या ठिकाणी जवळपास आकाराने सहा इंच असलेली जाडजूड मगर बसलेली पाहिली. मगर पाहताच धावत असताना झालेल्या आवाजाने मगर नदीमध्ये उतरली. त्यांच्याजवळ साधा मोबाईल असल्याने त्यांना फोटो घेता आला नाही.
म्हणून सदर घडलेला प्रसंग त्यांनी लगेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगितला, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ही बातमी कळताच पोलीस पाटील दत्तात्रय मिठारी यांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्यास कळवली. ज्या ठिकाणी मगर आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी सावध राहावे अशी सूचना दिली.