दैनिक तरुण भारत इफेक्ट
कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील सर्वच गावे वेगवेगळ्या दातृत्वासाठी व संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहेत.अशीच एक घटना काल कोगे येथे घडली. गावातील नदी काठी झाडावर अडकले वानर या दैनिक तरुण भारत बातमीमुळे रात्री अकराच्या दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संकपाळसाहेब व टीमच्या माध्यमातून वानरांना बाहेर काढण्यासाठी सुरुवात करण्यात आली. एक बोलेरो गाडी ट्रक मध्ये दोन बोटी व त्यासोबत जवळपास 40 युवकांची टीम या मोठ्या लव्याजम्यासह दाखल झाली.
शासकीय आदेशाचे कार्यतत्परतेने पालन करणे हे सर्व कोगे ग्रामस्थांनी व तरुणांनी याची देही. याची डोळा. रात्री अकरापासून दोन वाजेपर्यंत सुरु असलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून पाहिले.अंधारी रात्र व पाण्याचा प्रवाह या दोन गोष्टींमुळे रात्री या वानरांना सुरक्षित स्थळी हलवणे धोक्याचे असल्याने या टीमने त्या वानरांना केळी व इतर खाद्य पदार्थ देऊन आपले स्टिंग ऑपरेशन तात्पुरते थांबवले होते.
सकाळी 6 वाजल्यापासून परत या टीमने बोटीच्या सहाय्याने वानरांना सुरक्षित स्थळी जाता यावे. यासाठी झाडाला दोर बांधून ठेवला त्यापैकी दोन वानरांना या दोरच्या आधारे बाहेर येण्यात यश आले. कोगे गावातील ग्रामपंचायत सरपंच, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, करवीर पंचायत समिती सदस्य, प्रशासकीय सर्व विभागातील पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नातून जवळपास या सर्व ऑपरेशनमध्ये रात्री अकरा पासून सकाळी अकरापर्यंत बारा तासात आठ वानरांना बाहेर काढण्यात यश आले. यावेळी वनखात्याचे मानद वन्यजीव विभागाचे वन अधिकारी विजय पाटील, वनरक्षक के पी राहाटे, स्वप्निल पवार, व टीम यांच्या अनुभवानुसार राहिलेल्या दोन वानरांना दोरीच्या आधारे येण्यासाठी वेळ द्यावा यावर एकमत होऊन हे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करून त्या मानवाला दोरीच्या आधारे येण्यासाठी वेळ देण्यात आला.