ऑनलाईन टीम / तिरुवनंतपुरम :
केरळमधील कोची येथील संयुक्त डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) चे उमेदवार आणि माजी महापौर टोनी चम्मानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, केरळसह देशातील अन्य 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. केरळमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिलपासून सुरु आहे. तर मतमोजणी 2 मे 2021 पासून केली जाणार आहे. त्यातच आता मतदानापूर्वीच टोनी चम्मानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
यासोबतच केरळमध्ये दिवसेंदिवस रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 2,653 जणांना नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2,039 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 10 लाख 94 हजार 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्य स्थितीत 25,249 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.