भाजपकडून 9 जणांची दुसरी यादी प्रसिद्ध
भाजपने उत्तराखंड निवडणुकीसाठी 9 उमेदवारांची स्वतःची दुसरी यादी जाहीर केली आहे. पक्षाने माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांच्या कन्या ऋतू यांना कोटद्वार मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या वतीने हरक सिंह रावत यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता. रावत यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर ऋतू खंडुरी यांनी मागील निवडणुकीत यमकेश्वर मतदारसंघात विजय मिळविला होता. भाजपने यापूर्वी 59 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपने आतापर्यंत 69 उमेदवार जाहीर केले आहेत. राज्याच्या 70 सदस्यीय विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भाजपने अद्याप डोइवाला मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत करत आहेत. त्रिवेंद्र सिंह यांनी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना पत्र लिहून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचे कळविले होते.