बेळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे कोटपा कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलिसांना एक दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा प्रशिक्षण केंद्रात तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक कुबेर रायमाने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तंबाखू सेवनाने मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे तंबाखू आरोग्याला घातक आहे. म्हणून नागरिकांनी त्याचे सेवन करू नये, असे कुबेर रायमाने यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ उपस्थित होते. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या डॉ. सरोजा तिगडी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कोशच्या डॉ. श्वेता पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार यांच्या उपस्थितीत शिबिर झाले. कविता राजण्णावर यांनी सूत्रसंचालन केले.
Previous Articleयुवकांकडून देवदेवतांच्या फोटोंचे संकलन
Next Article नर्सिंग विद्यार्थ्यांना विद्याश्री वेतन द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.