रस्त्यांवर प्रवास करणाऱयांना होतोय त्रास
जगात अनेक आश्चर्यकारक हॉटेल्स आहेत. या हॉटेल्सच्या निर्मितीत कोटय़वधी रुपये खर्च होतात आणि अत्यंत विचारपूर्वक त्यांचे स्ट्रक्चर तयार केले जाते. अनेकदा त्यांचा लुक इतका भव्य आणि अनोखा असतो की प्रत्येकदा दंग होतो. असेच एक अनोखे डिझाइन ब्रिटनमध्ये मिल्टन कीन्सचे हॉटेल ला टूरचे आहे. परंतु याच्या निर्मितीवेळी मोठी चूक झाल्याने आता हॉटेलजवळून जाणाऱया लोकांना त्रास होतोय.
14 मजले आणि 261 खोल्यांचे हॉटेल ला टूरच्या निर्मितीसाठी 300 कोटींहून अधिक खर्च आला. हॉटेल पुढील वर्षी सुरू होणार आहे. या हॉटेलवर विशाल काच बसविण्यात आली आहे. या काचेवर सूर्यकिरणे पडताच अत्यंत प्रखर प्रकाश चमकतो, ज्यातून ही इमरात नव्हे तर सूर्यच असल्याचे वाटते. अशा स्थितीत नजीकच्या रस्त्यांवरून कार किंवा बाइकस्वार निघाल्यास त्याच्या डोळय़ांना त्रास होतो. याचमुळे परिसरात दुर्घटनेचा धोकाही वाढतोय.
स्ट्रक्चरमध्ये होणार बदल
लोक आता हॉटेलच्या काचेवर अँटी ग्लेयर कोटिंग बसविण्याची मागणी करत आहेत. सन वाइजर लावल्यावरही रिफ्लेक्शननंतर पडणारा प्रकाश कमी होत नसल्याचे लोकांनी म्हटले आहे. हॉटेलच्या प्रवक्त्याने लोकांच्या तक्रारींवर लक्ष देत आवश्यक बदल करणार असल्याचे सांगितले आहे. पूर्ण नियोजन आणि जनतेशी चर्चा केल्यावरच आम्ही इमारतीला स्टेनलेस स्टीलसारखा लुक देण्यासाठी काचेचा वापर केला होता अशी माहिती त्यांनी दिली.