प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्याला ऑक्सिजन पुरवठा करणाऱया कंत्राटदाराचे कोटय़वधीचे बील थकल्याने जिह्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला आह़े दरम्यान रूग्णसंख्या वाढत असताना जिह्यात ऑक्सिजन तुटवडय़ाची स्थिती निर्माण झाली होत़ी यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने कोल्हापूर व रायगड येथील अन्य कंत्राटदारांशी संपर्क साधून ऑक्सिजन पुरवण्याची विनंती केल़ी त्यानुसार जिह्याला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी दिवसाला 6 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत आह़े जिह्याला कोल्हापूर व रायगड येथील 3 पुरवठादार ऑक्सिजन पुरवठा करतात़ या तीनही कंत्राटदारांचे सुमारे दीड कोटींचे बील थकित असल्याची माहिती समोर आली आह़े हे बील लवकरात-लवकर न भरल्यास जिह्याचा ऑक्सिजन पुरवठा थांबवण्याचा इशारा कंत्राटदारांनी यापूर्वीच दिला होत़ी इशारा व मुदत देऊनही बील चुकते न झाल्याने या कंत्राटदाराने रत्नागिरी जिह्याचा ऑक्सिजन पुरवठा थांबवला होत़ा दरम्यान रत्नागिरी जिह्यात कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आल्याने ऑक्सिजनचीही मागणी घटली होत़ी आता पुन्हा एकदा रूग्णसंख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची व्यवस्था होणे अत्यावश्यक झाले आह़े त्यासाठी या कंत्राटदाराचे बील तातडीने चुकते करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती समोर येत आह़े
जिह्याला दुसऱया लाटेत मोठा फटका बसला होत़ा त्यावेळी काहीवेळा ऑक्सिजनची कमतरताही निर्माण झाली होत़ी दरम्यान कोरोनाच्या तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी 90 मेट्रीक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून करण्यात आली होत़ी त्यानुसार विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लांट जिह्यात उभारण्यात आले आहेत़ ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूकही करण्यात आली आह़े मात्र ऑक्सिजन पुरवठा करणाऱया कंत्राटदारांनी ऑक्सिजनचा पुरवठा थांबवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े तसेच बिल अदा करण्यामध्ये होत असलेल्या हलगर्जीपणाबद्दलही खंत व्यक्त होत आहे.