सहलीसाठी गेलेला 4 जणांचा गट
प्रतिनिधी / फोंडा
कोडार-खांडेपार येथे नदीकाठी सहलीसाठी गेलेल्या चार युवकापैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. अंबरेश अनंत सोलयेकर (34,सोलये, होंडा-सत्तरी) असे त्याचे नाव आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार आयटी तंत्रज्ञ युवकांचा गट कोडार येथील वैद्य फार्माजवळील कोडार नदीच्या पात्रात सहलीसाठी दुपारी 11 वा. दाखल झाला होता. दुपारी जेवणानतंर 2.30 सुमारास नदीच्या पात्रात आघोळ करीत असताना अंबरेश हा खोल दरीत बुडाला व बेपत्ता झाला. यावेळी मित्राकडून त्याला वाचविण्याचे व शोध घेण्याचे प्रयत्न असफल ठरले. फोंडा अग्निशामक दलाने मदतकार्य करताना तब्बल तीन तासानंतर मृतदेहाचा शोध घेतला. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून उपनिरीक्षक विभीनव शिरोडकर अधिक तपास करीत आहे.
कोडार नदीवर पाटर्या सर्रास, पोलिस फिरकत नसल्याचा ग्रामस्थांचा दावा
मागील चार दिवसापुर्वी मद्यधुंद अवस्थेतील एका युवतीची छेड काढण्याचा प्रयत्न काही युवकांकडून झाला होता. तसेच अनेक दारूच्या पाटर्य़ा सर्रास या स्थळावर होत असून रोबोट वाहनावरील पोलीसातर्फे मुद्दामहून कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. दर शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवसांनी पाटर्य़ा रंगत असुन यापुर्वी नदीच्या पात्रात बुडाल्याच्या घटनानंतर कोणतेच खबरादारीचे उपाय सरकारतर्फे तसेच सहलीसाठी येणाऱया युवकाकडून घेतले जात नाहीत.