वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंखेचे गांव म्हणून ओळख असलेल्या कसबा कोडोली येथे आज बुधवार दि. २ रोजी सकाळी ११ वा. नंतर अनावश्यक फिरणाऱ्या १७ जनांची कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात आली, त्यापैकी एक पॉझिटिव रुग्ण आढळल्याने चांगलीच धावपळ उडाली.
पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कवठेकर यांच्या सहभागाने फिरते कोरोनाचे अॅन्टीजेन तपासणी पथक ज्या गावात कोरोनाची संख्या वाढत आहे अशा गावात अनावशक फिरणाऱ्या व्यक्तीची अॅन्टीजेन तपासणी करीत आहे आज या फिरत्या पथकाने कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजीत पवार,तलाठी अनिल पोवार, ग्राम विकास अधिकारी ए. वाय. कदम, सरपंच मानिषा पाटील, उपसरपंच निखील पाटील, सर्व ग्रा.प. सदस्य व कर्मचारी,आरोग्य सेविका, कर्मचारी, कोतवाल सिराज आंबी यानी कोडोलीतील अनावशक फिरणाचा व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली तसेच संशयास्पद वाटणाऱ्याची अॅन्टी जेन तपासणी केली यामध्ये एकजन पॉझिटिव्ह सापडल्याने सर्वाची ताराबंळ उडाली.
कोडोलीत कोरोना बाधिताचा उद्रेक होत असून दैनंदिन वीस ते पस्तीस रुग्ण आढळत आहेत कोडोलीची लोकसंख्या पन्नास हजारावर .आहे तसेच बाजारपेठ असल्याने आस पासच्चा . गांवातील लोक ये – जा करतात त्यामुळे कोरोनाची ब्रेक द चेन थांबवण्यास अडथळे येवू लागले आहेत दैनदिन वीस ते पस्तीस रुग्ण चार दिवसात सापडू लागले आहेत त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने प्रशासन गतीने काम करू लागले आहे.