वारणानगर / प्रतिनिधी
चोपडे गल्ली, कोडोली ता. पन्हाळा येथून राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवुन नेले प्रकरणी वैभव दिपक चोपडे रा. चोपडे गल्ली कोडोली (ता. पन्हाळा) याच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्याद अल्पवयीन मुलीचे वडीलांनी कोडोली पोलिसात दिली आहे.
या बाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वैभव चोपडे याने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ती अल्पवयीन आहे. हे माहित असून सुद्धा राहत्या घरातून फूस लावून पळवून नेले असलेबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.