प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यानजीकच्या कोडोलीतील दत्तनगर कालव्याजवळ वडाच्या झाडाखाली देशी दारुची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. त्यांच्या ताब्यातील 2 हजार 280 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली. तर दुसरा संशयित फरारी झाला आहे.
अभिषेक गुलाब हावळे (वय 20, रा. धनगरवाडी, कोडोली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी कोडोली येथे अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कोडोलीतील दत्तनगर कालव्यानजिक वडाच्या झाडाखाली सुरु असलेल्या अवैध देशी दारु विक्रीवर छापा टाकला. यावेळी तिथे असलेल्या पैकी अभिषेक हवाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचा दुसरा सहकारी प्रशांत किर्तीकुडाव (रा. कोडोली, सातारा) हा फरारी झाला आहे. या छाप्यात त्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सातारा शहर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील 2 हजार 280 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.