एकास आठ दिवसाचा सश्रम कारावास : रात्री उपरात्री फिरणे पडले महागात
वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता पन्हाळा येथील कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाने जारी केलेल्या आदेशाचा भंग केले बद्दल पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील ३१ व्यक्तींनी आयोजीत महाअदालतीमध्ये गुन्हा कबूल केला असून यामध्ये तीस व्यक्तींना २०० रु. दंडाची तर एकास आठ दिवस सश्रम कारावस व २०० रु.दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
कोडोली पोलीस ठाण्यात आज रविवार दि. १ रोजी पन्हाळा न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे महालोक अदालत प्रक्रिया आयोजित करणेत केली होती.
या अदालतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाने गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी अति महत्वाचे कारणाशिवाय फिरू नये याबाबत कोडोली पोलिसांच्या वतीने लाऊडस्पीकरद्वारे सांगितले जात होते.परंतु काही हौसी नागरीक या आदेशाची पायमली करुन सार्वजनिक ठिकाणी फिरत होते. कोडोली पोलिसांनी या हौसी लोकांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल करणेत आलेल्या व्यक्तीना रविवारी कोडोली पोलिस ठाण्यामध्ये महालोक अदालतमध्ये उपस्थित रहाण्याच्या नोटीसा देवून उपस्थित ठेवण्यात आले होते. या लोकअदालतमध्ये २७ गुन्हयामध्ये ३० व्यक्तीनी गुन्हा कबूल केला. यावेळी ३० जणाना प्रत्येकी रु २०० इतका दंड, तसेच रात्री अपरात्री रस्त्यावरून फिरत असल्या प्रकरणी एकास आठ दिवसाचा सश्रम कारावास आणि दोनशे रुपये दंड व दंड न फिरल्यास जादा दोन दिवस सश्रम व दंड प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यानी ठोठावला.
या गुन्हयामध्ये रू.६२०० इतका दंड ठोठावणेत आला असल्याची माहिती स.पो.नि. दिनेश काशिद यांनी दिली . कोडोली पोलिस ठाण्यामध्ये रविवारी सकाळी पन्हाळयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात व्हीडीओ कॉन्प्रन्स द्वारे ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी कॉन्स्टेबल सागर कुंभार, प्रदिप यादव, जाणकर आदीजण उपस्थित होते.