वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली ता. पन्हाळा येथील संग्राम जाधव यांच्या विहरी जवळील झाडावर चढून शेरडासाठी वैरण ढाकत असताना विद्युत तारेचा शॉक लागून थेट विहरीत पडल्याने तरूणाचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. कशिलींग मंगेश नांगरे वय १८ रा. गणपती गल्ली कोडोली असे या तरूणाचे नाव असून त्याच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काशिलींग हा सकाळी ७ च्या सुमारास शेरडांना वैरणीसाठी गेला होता. ८ वा. च्या सुमारास जाधव यांच्या विहरीजवळ असलेल्या झाडावरील झुडपे ढाकत असताना कशिलींग नांगरे याचा विजेच्या तारेला स्पर्श होऊन त्याला जोराचा शॉक लागला या झटक्याने तो थेट विहरीत पडला त्याच्या सोबत वैरणीला आलेल्या लहाण मुलाने आरडा ओरड करीत शेत मळ्यातील लोकांना जमा केले मात्र कशिलींग नांगरे यातुन वाचु शकला नाही. घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड पोलीस पथकासह दाखल झालेवर आपतकालीन पथकाच्या सहाय्याने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर कोडोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.