प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण काल पूर्ण क्षमतेने भरले असून बुधवारी सकाळपासून सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. आता जिल्ह्यात जरी पावसाने पाठ फिरवली असली तरी आधी झालेल्य़ा गगनबावडा तालुक्यातील दमदार पाऊसमुळे आणि आता अधूनमधून होत असलेल्या रिमझिम पावसामुळे दोन दिवसांपूर्वी वेसरफ धरण भरले होते. तर काल धरणामध्ये ६.६० द.ल.घ.मि. इतका पाणीसाठा झाला आहे.
हि दोन्ही धरणे भरल्याने कुंभी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे शाखाधिकारी अभय हेर्लेकर यांनी दिली.