प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्लीच्या राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, सिंहगर्जना युवक मंडळ यांच्यातर्फे कोरोना महामारीत ज्या सामाजिक संस्था विनामूल्य सेवा करत आहेत त्यांना आर्थिक मदत दिली. याअंतर्गत हेल्प फॉर निडी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे शंकर पाटील, सहकारी व म. ए. समितीच्या कोविड केअर सेंटरसाठी प्रत्येकी 11 हजार अशी एकूण 33 हजार रुपयांची मदत केली. गल्लीतील युवराज चव्हाण, दत्ता पाटील, अभिजित सुणगार, अर्जुन गवळी, विनायक बेळगावकर, प्रसाद कुडतुडकर, निखिल देसूरकर, केतन देसूरकर, निखिल पानकर, अक्षय वाळके, उमेश लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.