दोडामार्ग / वार्ताहर:
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पने अंतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गतर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप करण्यात आल्या. हा कार्यक्रम तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा या प्रशालेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा या प्रशालेच्या दहा मुलींना प्रातिनिधिक स्वरुपात सायकल वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमास तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका तथा सिंधुदुर्ग जि. प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती डॉ. अनिषा दळवी, परिवर्तन केंद्र जिल्हा समन्वयक विलास हडकर, सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे, दोडामार्ग भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस, महीला तालुकाध्यक्ष कल्पना बुडकुले, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, कोनाळ सरपंच शपराशर सावंत, घोटगे सरपंच संदीप नाईक, कुडासे खुर्द सरपंच संगिता देसाई, भाजप सरचिटणीस सचिन गवस, शक्तीकेंद्रप्रमुख सुनिल गवस, महेश गवस, युवामोर्चा उपाध्यक्ष प्रकाश गवस, संस्था संचालक सुधाकर बांदेकर, आयी हायस्कूलचे अंकुश मिरकर, पिकुळे हायस्कूलचे निवृत्ती कांबळे, अशोक आंबुलकर, भेडशी हायस्कूलचे नंदकुमार नाईक, दोडामार्ग हायस्कूलच्या प्रतिक्षा नाईक, कोलझर हायस्कूलचे शत्रुघ्न सावंत, कोनाळकट्टा हायस्कूलचे लाभार्थी विद्यार्थी त्यांचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वनाथ सावंत यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष घोगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक ओंकार ओतारी, नैना मयेकर, प्रगती आडेलकर, विठ्ठल दळवी, गोविंद ठाकर आदींनी प्रयत्न केले.