गावातील वीजपुरवठा रात्रभर ठप्प / सत्तरी तालुक्मयातील सर्व वीज ट्रान्सफॉर्मर बदलणार : दीपक गवस
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील विजेचे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. गुरुवारी रात्री कोपर्डे येथील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे गावाचा वीजपुरवठा रात्रभर ठप्प झाला होता. ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारने सर्व ट्रान्सफॉर्मर बदलून फायबरच्या जागेवर पत्र्याचे ट्रान्सफॉर्मर घालण्यास सुरुवात केलेली आहे. सत्तरी तालुक्मयात जवळपास 250 ट्रान्सफॉर्मर अशा प्रकारे बदलण्यात येणार आहे.
कोपार्डे येथे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने हजारो रुपयाचे नुकसान
सत्तरी तालुक्मयातील कोपार्डे गावाच्या नजीक असलेल्या ट्रान्सफॉर्मर गुरुवारी मध्यरात्री जळाला. ट्रान्सफॉर्मरच्या भागाला अचानकपणे आग लागल्यामुळे सर्व यंत्रणा जळून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला त्वरित पाचारण करण्यात आल्यानंतर रात्रा 1 वा.च्या सुमारास ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग नियंत्रणात आली.
वाळपई वीज खात्याचे सहायक अभियंता दीपक गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार पडण्याची शक्मयता आहे. यामुळे वीज खात्याला लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कोपर्डे गावातील वीजपुरवठा रात्रभर ठप्प होता. दरम्यान आज सकाळी ताबडतोब दीपक गावस यांनी या संदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न करून जळलेल्या ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या कामाला सुरुवात केली. दुपारी 1 वा. वीजपुरवठा पूर्वपदावर आली. यावेळी नागरिकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम सुरू
सातत्याने वीज ट्रान्सफॉर्मरला आग लागत असल्यामुळे वीज खात्याने सर्व ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. जळणारे ट्रान्सफॉर्मर हे फायबरचे आहेत. यामुळे फायबरच्या जाग्यावर पत्र्याचे ट्रान्सफॉर्मर घादण्याच्या कामाला गेल्या काही दिवसापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असून येणाऱया अवघ्या दिवसांमध्ये सर्व ट्रान्सफॉर्मर नव्याने सज्ज करण्यात येणार असल्याचे दीपक गावस यांनी सांगितले. सत्तरी तालुक्मयात जवळपास 250 च्या आसपास ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येणार आहेत.