माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली पाहणी
वार्ताहर/ कराड
कराड शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असताना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी डॉ. प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून 30 ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. टाऊन हॉलसमोर जनता बँकेच्या शेजारी हे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व केसे येथील जे.डी. पाटील व पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या संकल्पनेतून डॉ. प्रवीण पाटील यांनी उभारलेल्या कोव्हिड सेंटरची पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. यावेळी जे. डी. पाटील, नामदेव पाटील, डॉ. प्रवीण पाटील उपस्थित होते. तीस ऑक्सिजन बेड असलेल्या या कोव्हिड सेंटरचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. दोन दिवसांत हे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
कराड तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येच्या प्रमाणात रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून स्व. यशवंतराव बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण पाटील यांनीही 30 बेडचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. दोन दिवसांत हे कोव्हिड सेंटर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.