नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना धरण परिसर शनिवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्याने हादरवून टाकले. शनिवारी (ता.8 जानेवारी) दुपारी 2 वाजुन 14 मिनिटांनी कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती कोयना भूकंप प्रशासनाने दिली.
भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून 8 किलोमीटर अंतरावर हेळवाक गावच्या नैऋत्येस 6 किलोमीटर अंतरावर नोंद झाले. दरम्यान या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापना कडून देण्यात आला.