प्रतिनिधी/ कोयनानगर
कोयनानगरसह संपूर्ण पाटण, कराड, चिपळूण तालुका रविवारी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिदू कोयनेपासून 28 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱयातील तनाली गावापासून 12 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली 15 किलोमीटर होती. हा भूकंप कोयना, पाटण, कराड, चिपळूण, पोफळी या ठिकाणी जाणवला. दरम्यान, या भूकंपामुळे कोयना धरणास कोणताही धोका नसून कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे उपविभागीय अभियंता, उपकरण विभाग, कोयनानगर यांनी कळविले आहे.