प्रतिनिधी/सांगली
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बुधवारी सकाळी 11 वाजता 10 फूटावरुन 5 फटावर आणले होते व विसर्ग कमी केला होता संध्याकाळी हे वक्र दरवाजे दिड फूटावर आणण्यात आले असून विसर्ग 10 हजार क्युसेस वर आणणेत आला आहे.
धरणक्षेत्रात पाऊस मंदावला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीला उतार सुरु आहे.सांगलीत पाणी पातळी एक फुटाने कमी झाली आहे. रात्री आणखी कमी होईल दरम्यान महापूर संकट टळले आहे.