वार्ताहर/ कोयनानगर
सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणाचा नदी विमोचक दरवाजा उघडून बुधवार 8 रोजी दुपारी एक वाजता 1500 क्युसेक व पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक असे एकूण 3600 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱया कोयना धरणामध्ये 8 मार्च रोजी सकाळी 67.05 टीएमसी पाणीसाठा असून जलाशयातील पाण्याची पातळी 2126 फूट व 7 इंच इतकी आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू असून नदीपात्रामध्ये 2100 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरुच आहे. सिंचनाची मागणी वाढल्यामुळे बुधवार 8 रोजी दुपारी एक वाजता कोयना धरणाचे नदी विमोचक उघडून 1500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे 8 रोजी कोयना नदीपात्रात एकूण 3600 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आली.