डाक विभागाने प्रसिद्ध केले “वाघ्या घेवडा ’’ चे स्पेशल कव्हर
वार्ताहर/ कोरेगाव
कोरेगावाचा राजमा अशी दिल्ली दरबारी ओळख असलेल्या वाघ्या घेवडा या वाणाची लोकप्रियता आता दिवसागणिक वाढू लागली असून भौगोलिक मानांकन अटववाघ्या घेवडा थेट पोस्टाच्या तिकिटावर विराजमान झाला असून भारतीय डाक विभागाने वाघ्या घेवडय़ाचे स्पेशल तिकीट कव्हर प्रसिद्ध केल्याने ही ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे.
महाराष्ट्र सर्कल अंतर्गत सातारा डाक विभाग, पुणे क्षेत्र यांचे मार्फत “वाघ्या घेवडा ’’ वर एक विशेष कव्हर प्रसिद्ध करण्यात आले, देऊर ता. कोरेगाव येथे एका विशेष कार्यक्रमामध्ये पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल श्रीमती जी. मधुमिता दास, , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबूले, तुळजाभवानी शेतकरी गटाचे अध्यक्ष मधुकर कदम, अधिक्षीका, सातारा डाक विभागाच्या अधिक्षिका अपराजिता म्रिधा प्रवर यांचे हस्ते जारी करण्यात आले.
वाघ्या घेवडा हा राजमाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये गुलाबी रंग आणि पट्टे आहेत, जसे की वाघाच्या अंगावर असतात म्हणून याचे नाव वाघ्या घेवडा असे आहे. या व्यतिरिक्त, हे एक पोषक कडधान्य आहे आणि कमी कॅलरी आणि संतृप्त चरबी आणि अँटीऑक्सिडंट्सने देखील समृद्ध आहे. 2016 मध्ये वाघ्या घेवडा ला उघ् टॅग प्राप्त झाला आहे.
भारतीय डाक विभागाने या वाघ्या घेवडा वर स्पेशल कव्हर प्रसिद्ध केल्याने वाघ्या घेवडय़ाच्या “आंतरराष्ट्रीय स्पेशल कव्हर व तिकीट’’ या जागतिक वारसा मध्ये समावेश झाला आहे. सातारा जिह्यासाठी ही एक अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे असे गौरवोद्गार उदय कबूले यांनी काढले.
या कार्यक्रमासाठी हंबीरराव कदम, केशव देशमुख, संतोष कदम, विठ्ठल कदम, विकास कदम, प्रदीप कदम, कमलाकर भोईटे, बाळकृष्ण कदम व वाघ्या घेवडा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.