दिलीप पायाजी असे मृताचे नाव, दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी, सर्व आरोपींना अटक न झाल्याने मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांचा नकार
प्रतिनिधी / पेडणे
माईणवाडा कोरगाव येथील दिलीप उर्फ बबलू अरविंद पायाजी (वय 25) याचा त्यांच्याच मित्रांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी हरमल समुद्र किनाऱयावर घडला. या प्रकरणी भटवाडी येथील सतीश नर्से, मनोज नर्से, सर्वेश नर्से, स्नेहल नर्से व स्वप्निल बली या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सतीश व स्वप्निल याना पा]िलसांनी अटक केली. यातील मुख्य संशयित आरोपी सतीश नर्से हा पोलीस कर्मचारी आहे.
दरम्यान, सर्व आरोपींना अटक होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृताच्या कुटुंबियांनी घेत शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेने पेडणे तालुक्मयात एकच खळबळ उडली. दिलीप हा वाडय़ावरील काही मित्रांसोबत हरमल समुद्रकिनाऱयावर स्नानासाठी गेले होते. सायंकाळी ते घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी भटवाडी येथील काही युवक येथे आले. त्यांनी घरी जाण्यासाठी निघालेल्या दिलीपला पुन्हा येथे बोलावले. यावेळी पार्किगच्या जागेत असणाऱया भटवाडी येथील सतीश नर्से, मनोज नर्से सर्वेश नर्से, स्नेहल नर्से व स्वप्निल बली या पाच जणांनापैकी एकाने दिलीपच्या डोक्मयावर मागून दंडुक्मयाने प्रहार केला. व इतरांनी त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, आपला मित्र मागे राहिला म्हणून परत पाहण्यासाठी आलेल्या दिलीपच्या मित्रांनी दिलीपला मारहाण होत असल्याचे पाहिले. ते त्याला सोडवायला गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या नंतर दिलीपला तुये येथील सामुदायिक उच्चस्तरीय आरोग्य केंद्रात नेले, मात्र त्यांचा मारहाणीत आगोदर मृत्यू झाला होता.
मयताचे वडील अरविंद पायाजी यांनी पेडणे पोलिसांना याबाबत तक्रार दिली. पेडणे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेत शुक्रवारी रात्री उशीरा खून प्रकरणातील मुख्य संशयीत असलेला डिचोली पोलीस स्थानकाचा पोलीस कर्मचारी सतीश नर्से व स्वप्निल बली यांना ताब्यात घेतले.
मित्रच बनले वैरी
दिलीप पायाजी याचे भटवाडी येथील नर्से वाडय़ावर अनेक मित्र होते. दिलीपला बबलू या नावाने ओळखले जात होते. भटवाडी येथे दिलीपचे जाणे-येणे होते. काही दिवसांपूर्वी भटवाडी येथील काही मित्रांसोबत त्यांचे बिनसले होते. त्यामुळे तो भटवाडी येथील मित्रांकडे जात नव्हता. अखेर त्या मित्रांनीच कुठल्यातरी कारणास्तव दिलीपला जबर मारहाण केली व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी पाचही संशयितांविरोधात भादंसं कलम 143, 147, 323, 302 व 149 नुसार गुन्हा नोंद केला आहे. यातील सतीश व स्वप्निल यांना अटक शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली मात्र आरोपींना अटक होत नाही तो पर्यत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा मयतचे वडिल अरविंद पायाजी व ग्रामस्थांनी दिला.
शनिवारी सकाळी परत मयत दिलीप याचे नातेवाईक व ग्रामस्थ तसेच मित्र मोठय़ा संख्येने पेडणे पोलीस स्थानकासमोर जमा झाले. खून प्रकरणातील इतर तिन्ही आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. सायंकाळी उशिरापर्यंत उर्वरित आरोपींना अटक न झाल्याने कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. अटक करण्यात आलेल्या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.