पेडणे पोलिसांची ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री कारवाई
पेडणे / ( प्रतिनिधी )
पेडणे पोलिसांनी मानशिवाडा कोरगाव येथील एका भाडय़ाच्या घरात राहत असलेल्या इफी चोकिकू डेव्हिड मधूक्मयू (वय 30 वर्षे) या नायजेरियन नागरिकांकडून 309 ग्रॅम कोकेन व 200 ग्रॅम एमडीएमए हे आमलीप्रदार्थ जप्त केले आहेत. या अमलीप्रदार्थाची किंमत बजारपेठेत 50 लाख 90 हजार रुपये आहे. संशयिताला 31 डिसेंबर रोजी रात्री अटक केली होती.
संशयिताला काल बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सोफाखाली सापडले अमलीपदार्थ
याबाबत पेडणे पोलिसांनी माहिती देताना सांगितले की आम्हाला गुप्त सूत्रांकडून मानशिवाडा कोरगाव येथे एक नायजेरियन नागरिक ड्रग्स् व्यवहारात गुंतल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, हवालदार अनंत भाईडकर, रुपेश कोरगावकर, विनोद शर्मा, विष्णू गाड, दयेश खांडेपारकर, गुरुदास मांदेकर यांचे पथक तयार करण्यात आले. अगोदर संशयित राहत असलेल्या घराची पाहणी करुन नंतर राञीच्यावेळी धाड घालून संशयिताला अटक केली. तो राहत असलेल्या भाडय़ाच्या घरातील सोफाखाली ड्रग्स् सापडला.
पकडलेले ड्रग्ज 50 लाख 90 हजारांचे
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी मागच्या चार दिवसांपूर्वी पोलिसांना आवाहन केले होते की किनारे ड्रग्जमुक्त करा. पोलिसांनी ड्रग्स व्यवहारात जे गुंतलेले आहेत त्यांना पकडावे असे आवाहन केले होते. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी गंभीर दखल घेऊन मोठय़ा प्रमाणात चरस जप्त केला. पकडण्यात आलेले अमलीपदार्थ 50 लाख 90 हजार रुपयांचे आहेत. गेल्या वषीही संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली 80 लाखांचा चरस जप्त करण्यात आला होता.
संशयित नायजेरियन इफी चोकिकू डेव्हिड मधूक्मयू यांच्या विरोधात भरतीय दंड संहिता, अमलीपदार्थ गुन्हय़ाखाली कलम 21 (8), 22 (8) या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी करत आहेत