पेडणे (प्रतिनिधी)
कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणी समस्या गंभीर असून ती लवकरात लवकर सोडविण्यासाठी कोरगाव पंचायत मंडळाने पेडणे येथील पाणी पुरवठा कार्यालयात कनि÷ अभियंते संदीप मोरजकर यांच्याशी चर्चा करुन उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. भाईड येथे न्य? कॉलनी,काळसेकरवाडा परिसर व दिलीप भाईडकर यांचे घर व परिसर, हरिजनवाडा – पेठेचावाडा पाळे – सुकाळे व भटवाडी येथे पाण्याची समस्या असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी कोरगावच्या सरपंच स्वाती गवंडी, उपसरपंच अब्दुल नाईक, पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, उदय पालयेकर, उमा साळगावकर यांचा समावेश होता.