ज्याची त्वचा कोरडी असते त्यांना त्वचेची काळजी घेण्यात खूपच समस्या येतात. कारण कोणतेही क्रीम किंवा मॉईश्चराईजर जास्त काळाकरिता त्यांच्या त्वचेवर टीकत नाही. जी खूपच मोठी समस्या आहे. कोरडय़ा त्वचेसाठी लोक अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने वापरतात. काही कालावधीनंतर त्याचा परिणाम दिसेनासा होतो आणि त्यांची त्वचा पुन्हा कोरडी होऊ लागते. त्यामुळे त्यांना कळत नाही की, नक्की काळजी कशी घ्यावी. कोरडय़ा त्वचेसाठी बाजारात मिळणाऱया प्रसाधनांऐवजी घरगुती उपायांचा वापर केल्यास ते स्वस्तही पडते आणि दीर्घ कालावधीसाठी त्वचा सुंदर राहण्यास एक चांगला पर्याय आहे.
वाढत्या वयानुसार त्वचा कोरडी होत जाते. कारण नैसर्गिकरित्या त्वचेतील तेल वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातं आणि त्वचेचा कोरडेपणा वाढतो. आवश्यक प्रमाणात पाणी न प्यायल्यास त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱयावर बारीक रेषा आणि त्वचेवर सुरकूत्या येऊ लागतात. त्वचा पुन्हा कोमल आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपायही खूप फायदेशीर ठरतात.
कोरडी त्वचा कशी ओळखावी
शुष्क त्वचेमध्ये आर्दतेच्या कमतरतेमुळे त्वचेमधील फॅटी ऍसिड (लिपीड) कमी होत जातात. जे त्वचेचा ओलावा कायम राखण्यास मदत करते आणि त्वचा कोमल ठेवत असते.
कोरडय़ा त्वचा होण्याची काही कारणे :
- ऋतूतील बदलांमुळे विशेषतः थंडी आणि कोरडय़ा हवामानात
- गरम पाण्याने आंघोळ केल्यावर
- स्विमींग पूलमधील क्लोरीनयुक्त पाण्याने
- साबण आणि डिटर्जंटमधील रसायनांमुळे
- सोरायसिस, एक्झिमा इ.
- त्वचेची स्वच्छता करणाऱया प्रोडक्ट्सच्या अधिक वापराने
- याशिवाय कॉलेस्ट्रॉल, रक्तदाब, ऍलर्जी आणि पिंपल्सची औषधं घेतल्यानेही त्वचा कोरडी होऊ शकते.
शुष्क किंवा कोरडय़ा त्वचेवर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. कारण अनेकदा डर्मेटाईटीस कोरडी त्वचा होण्याच कारणही असू शकते. त्यामुळे कोरडय़ा त्वचेची काळजी घेतल्यास नक्कीच फायदा होईल.
गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. जास्त काळ पाण्यात राहिल्याने किंवा पावसात भिजल्यानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे दररोज फक्त 5 ते 10 मिनिटं आंघोळ करावी.
मॉइश्चराईजरचा वापर तर करावाच पण त्यासोबतच सौम्य क्लींजर किंवा शॉवर जेलचाही वापर करा. हार्ड क्लींजरऐवजी अनसेंटेड आणि माईल्ड सोप क्लींजरचाही वापर करावा.
त्वचा ओली असल्यास मॉईश्चराईजर लावावा. आंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसावी. तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर तीन ते पाच मिनटाच्या आत मॉईश्चराईजर लावावा.
चेहरा दिवसातून वारंवार धुवू नये. शक्मय असल्यास फक्त रात्री चेहरा धुवावा. ज्यामुळे तुमच्या चेहऱयावरील दिवसभरातील धूळ निघून जाईल आणि त्वचा कोरडीही पडणार नाही.
ओठांसाठी चांगल्या लिपबामचा वापर करावा. त्या लिपबाममध्ये पेट्रोलटम, पेट्रोलिअम जेली आणि मिनरल ऑईल असली पाहिजे.
थंडीच्या काळात बाहेरील थंड वातावरणाशी संपर्क टाळण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्यावा. पण लक्षात घ्यावे की, त्वचेला स्कार्फच्या कापडाचा आणि ते वापरण्यासाठी वापरलेल्या डिटर्जंटचाही त्रास होऊ शकतो. प्रतिभा प्रमोद भोंसुले