ऑनलाईन टीम / मुंबई :
प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना मंगळवारी रात्री वांद्रे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, सगळीकडेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट ही करण्यात आली. त्यांच्या टेस्ट चे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने दिली.