वृत्तसंस्था/ ऍडलेड
शनिवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील ऍडलेड खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कोरियाचा केओन सून वू याने पुरुष एकेरीच अजिंक्यपद मिळवताना स्पेनच्या राबर्टो ऍग्युटचा पराभव केला. शनिवारी खेळवण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात वूने ऍग्युटचा 6-4, 3-6, 7-6(7-4) अशा सेटस्मध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 2 तास 43 मिनिटे चालला होता. एटीपी टूरवर वूचे हे दुसरे विजेतेपद आहे. 2021 साली त्याने कजाकस्तानमधील ऍस्टेना खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. एटीपीच्या क्रमवारीत तो सध्या 52 व्या स्थानावर आहे.