कोरेगाव / वार्ताहर :
कोरेगावाचा राजमा अशी दिल्ली दरबारी ओळख असलेला वाघा घेवडा या वाणाची लोकप्रियता आता दिवसागणिक वाढू लागली आहे. भौगोलिक मानांकन अटववाघ्या घेवडा थेट पोस्टाच्या तिकिटावर विराजमान झाला असून, भारतीय डाक विभागाने वाघ्या घेवड्याचे स्पेशल तिकीट कव्हर प्रसिद्ध केल्याने ही ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे.
महाराष्ट्र सर्कल अंतर्गत सातारा डाक विभाग, पुणे क्षेत्र यांचे मार्फत “वाघ्या घेवडा” वर एक विशेष कव्हर प्रसिद्ध करण्यात आले. देऊर ता. कोरेगाव येथे एका विशेष कार्यक्रमामध्ये पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल जी. मधुमिता दास, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबूले, तुळजाभवानी शेतकरी गटाचे अध्यक्ष मधुकर कदम, अधिक्षीका, सातारा डाक विभागाच्या अधिक्षिका अपराजिता म्रिधा प्रवर यांचे हस्ते जारी करण्यात आले.
वाघा घेवडा हा राजमाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये गुलाबी रंग आणि पट्टे आहेत, जसे की वाघाच्या अंगावर असतात, म्हणून याचे नाव वाघा घेवडा असे आहे. या व्यतिरिक्त, हे एक पोषक कडधान्य आहे आणि कमी कॅलरी आणि संतृप्त चरबी आणि अँटीऑक्सिडंट्सने देखील समृद्ध आहे. 2016 मध्ये वाघ्या घेवडा ला उघ् टॅग प्राप्त झाला आहे.
भारतीय डाक विभागाने या वाघ्या घेवडावर स्पेशल कव्हर प्रसिद्ध केल्याने वाघ्या घेवडय़ाच्या “आंतरराष्ट्रीय स्पेशल कव्हर व तिकीट” या जागतिक वारसामध्ये समावेश झाला आहे. सातारा जिह्यासाठी ही एक अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार उदय कबूले यांनी काढले.