प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोगेटेड बॉक्सच्या उत्पादन खर्चात 70 टक्क्यांनी वाढ झाल्याने,हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सरकारने या उद्योगावर लक्ष घालावे अशी मागणी वेस्टर्न इंडिया कोरोगेटेड मॅन्युफॅक्चरींग असोसिएशन (डब्लूआयसीएमए सहयाद्री डिव्हीजन) च्या बैठकीत करण्यात आली आहे. असे पत्रक प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
कोरोगेटड बॉक्ससाठी लागणाऱया क्राफ्ट पेपरच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच भारतामध्ये तयार होणारा क्राफ्ट पेपर चीनला निर्यात होत असल्याने,कच्च्या मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत असल्याने, हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोगेटेड बॉक्स हा पॅकेजिंगमधील महत्वाचा घटक आहे. बॉक्सच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने,हा उद्योग सावरण्याची गरज आहे. यासाटी केंद सरकारने या परिस्थितीवर लक्ष घालण्याची गरज असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. या बैठकीत प्रताप पुराणिक,शशिकांत सावंत,अशोक पाटील,अशोक चौगुले आदींनी मार्गंदर्शंन केले.