वार्ताहर / कबनूर
कोल्हापूर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले विवेकानंदनगर येथील चार व लोकमान्य नगरमधील दोन असे सहा जणांना स्वॅब घेण्यात आले होत. आज त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.
अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोची ता. हातकणंगले येथील लोकमान्यनगर व विवेकानंदनगर येथील एकाच कुटुंबातील 6 जण कोल्हापूर येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या 6 जणांना संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले होते.
आज मंगळवारी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या गावाला दिलासा मिळाला आहे. तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता सर्वांनी मास्क व सॅनिटायझरजचा वापर करून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाहेर पडू नये असे आवाहन सरपंच रेखा पाटील, ग्रामविकास अधिकारी राजू जाधव पोलीस पाटील, मारुती हेगड, आरोग्य अधिकारी संदीप गणबावले यांनी केले आहे.