बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोनाचे ७,८८३ नवीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी एकट्या बेंगळूर शहरात २,८०२ रुग्ण आढळले, तर ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संक्रमित लोकांची एकूण संख्या १,९६,४९४ वर पोहोचली आहे. यापैकी१,१२,६३३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ८०,३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी एकाचवेळी ७,०३४ रूग्णांना रुग्णालयातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३,५१० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात ७०१ रूग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
बुधवारी एकूण २७२५० आरटी-पीसीआर आणि २६,०७६ जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या. एका दिवसात ५३,३२६ रूग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण १८,२६,३१७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
बेंगळूर शहरात एकूण रुग्णांची संख्या ७९,८४० वर पोहोचली आहे. यापैकी, ३३,४८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, ४५,०३४ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी रुग्णालयातून २,३६० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे एकूण १,३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बुधवारी २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.