श्वास घेण्यास त्रास होत असल्यास 40 मिनिटे पोटावर झोपावे : ही स्थिती नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करते
कोरोना संक्रमणामुळे बहुतांश रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. प्राणवायूची पातळी खालावल्यावर रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा रुग्णांना प्रोन पोजिशन ऑक्सिजनेशन तंत्रज्ञान 80 टक्क्यांपर्यंत उपयुक्त आहे. सर्व चिकित्सा प्रणालीच्या तज्ञ डॉक्टरांनी प्रोन पोजिशनला रुग्णालयांमध्ये दाखल कोरोनाबाधितांसाठी ‘संजीवनी’ ठरविले आहे.
श्वास घेण्यास त्रास झाल्यावर या स्थितीत 40 मिनिटांपर्यंत राहिल्यास प्राणवायूची पातळी सुधारते. पोटावर झोपल्याने व्हेंटिलेशन परफ्यूजन इंडेक्समध्ये सुधारणा होते. श्वास घेण्यास त्रास झाल्यावर हे तंत्रज्ञान पडताळून पाहू शकता, असा सल्ला डॉक्टरांनी कोरोनाबाधितांना दिला आहे. या स्थितीचा वापर एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेसच्या अवस्थेत केला जातो, जेणेकरून प्राणवायूचा पुरवठा करता येईल. अशा स्थितीत फुफ्फुसांच्या खालील हिस्स्यात पाणी येते.
घ्यावी लागणारी खबरदारी
मानेच्या खाली एक उशी, पाय-गुडघ्यांखाली दोन उशी ठेवाव्यात आणि पंज्यांच्या खाली एक उशी ठेवण्यात यावी. दर 6 ते 8 तासांमध्ये 40-45 मिनिटे असे करण्यास सांगितले जाते. पोटावर झोपून हातांना कंबरेजवळ समांतरही ठेवता येऊ शकते. या अवस्थेत फुफ्फुसांमध्ये रक्ताचा प्रवाह चांगला होऊ लागतो. फुफ्फुसांमधील फ्लुइड संचारित होऊ लागते आणि तेथपर्यंत प्राणवायू पोहोचू लागतो. प्रोन पोजिशन सुरक्षित असून रक्तात प्राणवायूची पातळी बिघडल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम करते. तसेच यातून मृत्यूदरही कमी करता येतो. अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांना प्रोन पोझिशनने चांगले निष्कर्ष प्राप्त होतात. व्हेंटिलेटर न उपलब्ध झाल्यास हेच सर्वात उपयुक्त तंत्रज्ञान आहे. यातून 80 टक्क्यांपर्यंतचे निष्कर्ष व्हेंटिलेटरसारखेच मिळतात.